सकाळ डिजिटल टीम
घराबाहेर पडण्यापूर्वी SPF 30 किंवा त्याहून जास्त असलेला सनस्क्रीन लावा. प्रत्येक 2-3 तासांनी पुन्हा लावा.
दिवसभरात 8-10 ग्लास पाणी प्या. नारळपाणी, लिंबूपाणी आणि ताजे फळांचे रस आहारात समाविष्ट करा.
कोरफड (अॅलोवेरा) जेल, गुलाबपाणी, काकडीचा रस यासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करा. तेलकट त्वचेसाठी वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा.
माइल्ड फेसवॉश वापरून चेहरा दिवसातून दोन वेळा धुवा. जास्त फेसवॉश केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते.
फळे आणि भाज्यांचा समावेश करा. तळकट आणि मसालेदार पदार्थ टाळा, कारण यामुळे पिंपल्स आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात.
त्वचेवरील मृत पेशी काढण्यासाठी घरगुती स्क्रब (बेसन + दूध + मध) वापरा.
कॉटन किंवा लूज फिटिंग कपडे घाला, जेणेकरून घामामुळे त्वचेला त्रास होणार नाही.