Aarti Badade
जिभेवर व्रण किंवा अल्सर येण्यामागे पोटातील उष्णता, जीवनसत्त्वांची कमतरता, तणाव किंवा वारंवार जीभ चावणे अशी अनेक सामान्य कारणे असू शकतात.
Tongue ulcer causes
Sakal
शरीरात व्हिटॅमिन B12, लोह (Iron) किंवा फॉलिक ॲसिडची कमतरता असल्यास जिभेवर वारंवार फोड किंवा जखमा होण्याची शक्यता वाढते.
Tongue ulcer causes
sakal
अति मसालेदार, तिखट, गरम किंवा आंबट पदार्थ खाल्ल्याने जिभेची त्वचा संवेदनशील होते, ज्यामुळे अल्सरचा त्रास जाणवू शकतो.
Tongue ulcer causes
Sakal
वारंवार होणारे अल्सर हे कमकुवत रोगप्रतिकारशक्ती किंवा पचनसंस्थेतील बिघाडाचे संकेत असू शकतात. ॲसिडिटीमुळेही हा त्रास वारंवार उद्भवतो.
Tongue ulcer causes
Sakal
दिवसातून २-३ वेळा कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यास जखम लवकर भरून येते. तसेच दररोज तोंडाची स्वच्छता राखणे आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
Tongue ulcer causes
Sakal
आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, दूध आणि अंडी यांचा समावेश करा. तंबाखू आणि मद्यपानापासून दूर राहिल्याने अल्सरचा धोका कमी होतो.
Tongue ulcer causes
Sakal
जर अल्सर १० ते १५ दिवसांत बरे झाले नाहीत, तीव्र वेदना होत असतील किंवा रक्तस्त्राव होत असेल, तर उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Tongue ulcer causes
Sakal
Benefits of quitting sugar
Sakal