सकाळ डिजिटल टीम
अर्धा किलो चिकन,मॅरीनेट करण्यासाठी मसाला: आलं, लसूण, कोथिंबीर, हळद, गरम मसाला,रश्याच्या वाटणासाठी कांदा, सुकं खोबरं, धने, शहाजिरे, मिरी, लवंग, वेलची, दालचिनी टोमॅटो प्युरी, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर
आलं-लसूण-कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून चिकनवर लावा. हळद, गरम मसाला, आणि मीठ घालून ४-५ तास फ्रीजमध्ये मॅरीनेट करा.
पातेल्यात तेल गरम करून कांदा, धने, शहाजिरे, मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलची परता. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर सुकं खोबरं घालून खरपूस भाजा.
भाजलेले मसाले थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.
पातेल्यात तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर परता. त्यात लाल तिखट घाला आणि मॅरीनेट केलेले चिकन घालून परता.
त्यात १ कप पाणी घाला आणि १०-१५ मिनिटे चिकन शिजू द्या. नंतर टोमॅटो प्युरी आणि वाटण घालून नीट मिक्स करा.
गरज असल्यास आणखी मीठ घालून एक उकळी काढा. वरून कोथिंबीर घाला सर्व्ह करा.
हे चिकन तांदळाच्या भाकरी किंवा मालवणी कोंबडी वड्याबरोबर चांगले लागते.