सकाळ डिजिटल टीम
५०० ग्रॅम चिकन, २ मोठे कांदे, १ मोठा टोमॅटो, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, २ टिस्पून काळा मसाला, १ टिस्पून लाल तिखट, १ टिस्पून हळद, १ टिस्पून गरम मसाला, १/२ कप दही, ३ टेबलस्पून तेल.
कढईमध्ये तेल गरम करून कांदा साधारण काळपट होईपर्यंत फ्राय करा. फ्राय केलेला कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची एकत्र वाटून घ्या.
भांड्यात तेल गरम करा आणि त्यात तयार केलेलं वाटण घाला. २-३ मिनिटे परतून हळद, लाल तिखट, काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
भाजलेले खोबरे वाटण घाला आणि चिकन घालून सर्व चांगले मिक्स करा.
आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि वाफेवर चिकन शिजवून घ्या.
चव तपासून, गरम मसाला घाला. चिकन मस्त तयार आहे.
गरम गरम काळा मसाला चिकन सर्व्ह करा. भाकरी सोबत अतिशय चविष्ट लागत.