Anushka Tapshalkar
दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो, जो पर्यावरण संवर्धनासाठी एक जागतिक उपक्रम आहे.
या दिवशी हवामान बदल, प्रदूषण, प्लास्टिकचा वापर अशा मुद्द्यांवर लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते.
प्लास्टिकचा वापर कमी करून इको-फ्रेंडली प्रोडक्ट्स वापरणे हे शाश्वत जीवनशैलीकडे जाण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे.
पॉलीथिनच्या ऐवजी कापूस किंवा ज्यूटच्या पिशव्या वापरा. या पिशव्या टिकाऊ, धुवून पुन्हा वापरण्यायोग्य असतात.
केळ्याच्या पानांचे ताट, पत्तल, दोने यांचा वापर प्लास्टिकच्या प्लेट्सऐवजी करता येतो. हे नैसर्गिक असल्यामुळे सहज कुजून जातात आणि खत बनतात.
बांबूपासून टूथब्रश, कटलरी, स्ट्रॉ यांसारख्या अनेक वस्तू बनतात. हे बायोडिग्रेडेबल असून पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत.
प्लास्टिक रॅपर्सच्या जागी पेपर किंवा कार्डबोर्डपासून बनवलेले पॅकेजिंग वापरावे. हे रिसायकल करता येते आणि पर्यावरणावर कमी परिणाम होतो
प्लास्टिकच्या बाटल्यांच्या आणि डब्यांच्या ऐवजी स्टील, काच किंवा मातीची भांडी वापरावीत. ही भांडी टिकाऊ असून आरोग्यासाठी सुद्धा सुरक्षित असतात.