Anushka Tapshalkar
पावसाळ्यात त्वचेच्या समस्यांचा धोका अधिक वाढतो. तो टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा यामधून काही त्वचाविकारांचा धोका बळावण्याची शक्यता असते.
ओली त्वचा फंगल इन्फेक्शनसाठी अनुकूल असते. त्यामुळे त्वचा स्वच्छ व कोरडी ठेवावी.
इन्फेक्शनचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटी-फंगल पावडर वापरणे फायदेशीर.
ओले कपडे व शूज लगेच बदला. त्यात सर्दी व त्वचाविकारांचा धोका अधिक असतो.
बाहेर पडताना छत्री वा रेनकोट घेणे गरजेचे. भिजलात तरी अंग व केस कोरडे करावेत.
बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा. चिखलामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते.
नखे वेळेवर कापावीत आणि स्वच्छ ठेवावीत. इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
टाइट कपड्यांऐवजी सैल व हवा खेळती राहील असे कपडे घाला.
समस्या वाढल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.