सकाळ डिजिटल टीम
होळी हा रंगांचा सण आहे, जो भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्वाचा मानला जातो.
होळीला योग्य रंगांचा वापर केल्यास ग्रहांचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो आणि भाग्य चमकू शकते.
मेष आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी लाल, गुलाबी आणि पिवळा रंग वापरणे फायदेशीर ठरू शकते.
वृषभ आणि तूळ राशीच्या व्यक्तींनी पांढरा, गुलाबी, करडा तसेच निळा आणि हिरवा रंग वापरणे शुभ ठरू शकते.
मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी हिरव्या रंगाचा वापर करणे शुभ मानले गेले आहे.
कर्क राशीच्या व्यक्तींनी पांढरा, करडा आणि पिवळा रंग वापरणे शुभ मानले जाते.
सिंह राशीच्या व्यक्तींनी नारंगी आणि पिवळा रंग वापरणे फायदेशीर ठरू शकते.
धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींनी पिवळा, लाल आणि नारंगी रंग वापरणे शुभ ठरू शकते.
मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी निळा आणि वांगी रंग वापरणे लाभदायक ठरू शकते.
होळी सण तरुणाईमध्ये विशेष उत्साह आणतो आणि आनंद व सकारात्मकता वाढवतो.