सकाळ डिजिटल टीम
होळी हा सण प्रेम आणि रंगांचा असतो, पण रंगांच्या वापरामुळे आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.
रंग तयार करण्यासाठी एस्बेस्टोस, खडूंची भुकटी, सिलिका आणि इंजिन तेलांचा वापर होतो, जे डोळे आणि त्वचेसाठी हानिकारक असतात.
रासायनिक रंग डोळ्यांना एलर्जी, सूज, आणि आग होण्यास कारणीभूत ठरू शकतात.पिचकारी आणि पाण्याचे फुगेही डोळ्यांना इजा करू शकतात.
शक्यतो नैसर्गिक रंगांचा वापर करा. होळी खेळताना गॉगल्स घालल्याने डोळ्यांचे संरक्षण होईल.
केस बांधून किंवा टोपी घालून खेळा. रंगीत पाणी डोळ्यात जाऊ नका.
कोणीतरी तुम्हाला रंग लावत असेल तर डोळे बंद करा.
कॉन्टॅक्ट लेन्स घालून होळी खेळणे धोकादायक ठरू शकते, कारण रंग लेन्समध्ये अडकून डोळ्यांवर वाईट परिणाम करू शकतो.
जर रंग डोळ्यांमध्ये गेले, तर डोळे चोळू नका. स्वच्छ पाण्याने त्वरित डोळे धुवा.