सकाळ डिजिटल टीम
आज (22 जून) प्रसिद्ध अभिनेते अमरीश पुरी यांचा जन्मदिवस आहे. यांच्या जन्मदिवसानिमित्ताने जाणून घेऊया.. त्यांच्या जीवनातील सर्वात यशस्वी चित्रपटाबद्दल ..
अमरीश पुरी यांनी बॉलिवूडला अनेक हीट चित्रपट दिले आहेत. मुझसे शादी करोगी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, गदर-एक प्रेम कथा, करण-अर्जुन आदी चित्रपटातून चाहत्यांमध्ये लोकप्रियता मिळवली.
चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेतून वेगळी ओळख निर्माण करणारे अमरीश पुरी यांनी 430 पेक्षा अधिक चित्रपटामध्ये काम केले आहे.
त्यांच्या कारकिर्दीत सर्वात जास्त कमाई गदर-एक प्रेमकथा या चित्रपटाने केली आहे.
जगभरात या चित्रपटाची कमाई 132.60 कोटी झाली होती. त्यामुळे हा चित्रपट अमरीश पुरी याच्या जीवनातील सर्वात यशस्वी चित्रपट आहे.
1947 च्या भारत-पाकिस्तान विभाजनाच्या पृष्ठभूमीवर आधारित या चित्रपटात त्यांनी सकीनाचे वडील अशरफ अलीची भूमिका निभावली होती. याने पाकिस्तानमध्ये खळबळ निर्माण केली होती.
नुकत्याच झालेल्या गदर-2 च्या रिलीजनंतर गदर चित्रपटाच्या जुन्या चाहत्यांनी अमरीश पुरी यांची खूप आठवण काढली .
या प्रसिद्ध अभिनेत्याचे ब्रेन हैमरेज या आजारामुळे 12 जानेवारी 2005 रोजी त्यांचे निधन झाले.'हा' आहे... भारताच्या इतिहासात सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता