सकाळ डिजिटल टीम
आज आपण भारताच्या इतिहासात सर्वाधिक चित्रपट करणाऱ्या अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत.
शक्ती कपूरच्या चित्रपटातील खलनायक आणि विनोदी भूमिकेने चाहत्यांच्या मनावर भुरळ घातली आहे.
कुर्बानी, रॉकी, हिम्मतवाला, हिरो, अंदाज अपना अपना या चित्रपटातून लोकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
याने बॉलिवूडमधील 700 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून हा बॉलिवूडमधील सर्वात जास्त चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता आहे.
एका मिडीया रिपोर्ट्स नुसार शक्ती कपूरची एकून संपत्ती साधारणपणे 36-38 कोटी आहे.
शक्ती कपूरच्या पत्नीचे नाव शिवांगी कपूर असून त्यांना मुलगा सिद्धांत कपूर आणि मुलगी श्रद्धा कपूर आहे.
चित्रपटसृष्टीमध्ये वडीलांप्रमाणेच श्रद्धा कपूर मोठ्या पडद्यावर लोकप्रियता मिळवत आहे.
तर मुलगा सिद्धांत कपूर सहाय्यक दिग्दर्शक आणि अभिनयांसाठी ओळखला जातो.