Aarti Badade
जागरूकता, वेळेवर होणारे निदान आणि लसीकरणामुळे एकेकाळी घातक ठरणारा हा कर्करोग आता भारताच्या आरोग्य क्षेत्रातून हळूहळू माघार घेत आहे.
Cervical cancer symptoms
Sakal
दोन मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव होणे किंवा शारीरिक संबंधांनंतर वेदना आणि रक्तस्त्राव होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे असू शकतात.
Cervical cancer symptoms
Sakal
मासिक पाळी पूर्णपणे बंद झाल्यानंतर पुन्हा रक्तस्त्राव होणे किंवा योनिमार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव होणे हे धोक्याचे संकेत आहेत, ज्यासाठी त्वरित तपासणी आवश्यक आहे.
Cervical cancer symptoms
Sakal
हा कर्करोग विकसित होण्यासाठी १० ते १५ वर्षांचा वेळ लागतो; याच काळात स्क्रीनिंग केल्यास कर्करोग होण्यापूर्वीच त्यावर उपचार करून तो मुळापासून नष्ट करता येतो.
Cervical cancer symptoms
Sakal
वयाच्या ३० वर्षांनंतर प्रत्येक महिलेने दर ३ ते ५ वर्षांनी 'पॅप स्मीअर' किंवा 'HPV DNA' टेस्ट करणे अनिवार्य आहे, ज्यामुळे कर्करोगाचा धोका अनेक वर्षे आधीच ओळखता येतो.
Cervical cancer symptoms
Sakal
वयाच्या ९ ते १४ वर्षांमधील मुलींना 'HPV लस' दिल्यास भविष्यात त्यांना या कर्करोगापासून जवळपास १००% संरक्षण मिळू शकते.
Cervical cancer symptoms
Sakal
मासिक पाळीत स्वच्छता, लग्नाचे वाढलेले वय आणि मोफत स्क्रीनिंग मोहिमांमुळे महिलांमधील कर्करोगाचा मृत्यूदर कमी होण्यास मोठी मदत होत आहे.
Cervical cancer symptoms
Sakal
Non-Alcoholic Fatty Liver Disease
Sakal