Pranali Kodre
भारतीय संघाची इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १८ जानेवारीला निवड करण्यात आली.
पण ही निवड करताना कदाचित निवड समितीकडून मोठी चूक झाली आहेत, ज्याचा थोडक्यात आढावा घेऊ.
जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यांच्या तंदुरुस्तीवर अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे ते खेळणार की नाही, हे अद्यापही निश्चित नाही.
अशातच निवड समितीने भारतीय संघात रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या तीन फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंना संधी दिली आहे. पण हे तिघेही एकाच प्रकारचे गोलंदाज आहेत.
त्यामुळे यांच्यातील एका खेळाडूच्या जागेवर एक स्पेशालिस्ट स्पिनर खेळू शकला असता. वरुण चक्रवर्ती किंवा युजवेंद्र चहलला संधी मिळू शकली असती.
किंवा भारतीय संघ नितीश कुमार रेड्डीलाही संघात स्थान देऊ शकले असते, ज्यामुळे वेगवान गोलंदाजीसाठी एक पर्याय मिळाला असता आणि त्याचसोबत फलंदाजीही आणखी सखोलता मिळाली असती.
बुमराह देखील सध्या पूर्ण तंदुरुस्त नसल्याने एका अष्टपैलू खेळाडूच्या जागेवर मोहम्मद सिराजलाही संधी मिळू शकली असती.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.