Pranali Kodre
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का यांचे अलिबागमधील बंगला गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे.
त्यांच्या घरी गृहप्रवेशाची तयारी सुरू असल्याचे फोटोही बरेच व्हायरल झाले होते. पण त्यांचे हे नवे हॉलीडे होम आहे तरी कसे, याची उत्सुकता अनेकांना असेल.
विराट आणि अनुष्का यांचा हा बंगला ८ एकर जागेत बांधलेला आहे. १०००० स्क्वेअर फिट विला असून आजूबाजूला सुंदर गार्डन आहे.
तापमान नियंत्रित करू शकेल असा स्विमिंगपूलही या बंगल्यात आहे. तसेच पार्किंगचीही सुविधा आहे. यात चार बाथरुम, स्टाफ क्वार्टर्स, ऑटोमॅटीक पडदे आणि जाकुझीही आहे.
त्यांचे हे आलिशान घर प्रसिद्ध कंपनी SAOTA ने फिलिप फॉश अंतर्गत डिझाईन केले आहे. या घरात कॅलिफोर्निय कोकण स्टाईल चार बेडरुम आहेत.
घराचे छत उंच असून मोठ्या खिडक्या आहेत, ज्यातून भरपूर सूर्यप्रकाश घरात येत आहे, तसेच आजूबाजूचा नयनरम्य निसर्गही पाहाता येत आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार विराट आणि अनुष्काने २०२२ मध्ये अलिबागमध्ये ही जागा १९ कोटी रुपयांना खरेदी केली होती, त्यानंतर बांधकामासाठी त्यांना १३ कोटी खर्च करावा लागला. त्यामुळे या आलिशान घराची किंमत आता ३२ कोटी आहे.
विराट आणि अनुष्का हे सेलिब्रेटी असल्याने त्यांच्या भोवती नेहमीच चाहत्यांचा गोतावळा दिसतो, त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला कडक सुरक्षाही दिसून येते. त्यांच्याकडे वैयक्तिक बॉडीगार्डही आहेत.
त्यामुळे रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून निवांत काही वेळ घालवण्यासाठी त्यांच्यासाठी आता अलिबागचे घर एक चांगला पर्याय ठरू शकतो.