कितीही कमवा, पैसा साठत नाही? चाणक्यांच्या मते ‘या’ 3 चुका कारणीभूत ठरू शकतात!

Aarti Badade

पैसा टिकवायचा असेल तर...

आचार्य चाणक्यांनी जीवनातील आर्थिक शिस्तीबाबत अनेक विचार मांडले आहेत. त्यांच्या नीतीनुसार काही चुकीच्या सवयींमुळे पैसा हातात असूनही टिकत नाही.

chanaky niti

|

Sakal

चाणक्यांनी सांगितलेल्या ३ चुका

पैसा कमावण्यासोबतच तो योग्य पद्धतीने टिकवणेही महत्त्वाचे आहे. चाणक्य नीतीनुसार अहंकार, फिजूलखर्ची आणि चुकीच्या मार्गाने कमाई या तीन गोष्टी आर्थिक नुकसानाला कारणीभूत ठरू शकतात.

chanaky niti

|

Sakal

पहिली चूक : अहंकार

पैसा आणि संपत्ती मिळाल्यानंतर गर्व किंवा अहंकार वाढला, तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर होऊ शकतो. पैशांचा गर्व नातेसंबंध आणि आर्थिक स्थैर्य दोन्हींवर परिणाम करू शकतो, असे चाणक्य नीतीत सांगितले जाते.

chanaky niti

|

Sakal

दुसरी चूक : फिजूलखर्ची

गरज नसताना सतत पैसे खर्च करण्याची सवय बचतीला मोठा धक्का देऊ शकते. विचार न करता केलेला खर्च भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण करू शकतो, त्यामुळे उत्पन्नानुसार खर्चाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

chanaky niti

|

Sakal

पैसा आला की सगळा खर्च करू नका!

महागड्या वस्तू, अनावश्यक खरेदी किंवा केवळ दिखाव्यासाठी केलेला खर्च टाळणे गरजेचे आहे. कमाईसोबत बचत आणि योग्य आर्थिक नियोजन केले तर भविष्यातील अडचणी टाळण्यास मदत होऊ शकते.

chanaky niti

|

Sakal

तिसरी चूक : चुकीच्या मार्गाने कमाई

लाच किंवा फसवणुकीसारख्या चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा कायमस्वरूपी सुख देत नाही, असा चाणक्य नीतीचा संदेश आहे. प्रामाणिक मार्गाने कमावलेला पैसा आणि योग्य आचरण यांना अधिक महत्त्व दिले जाते.

chanaky niti

|

Sakal

चाणक्य नीतीचा संदेश

संपत्ती मिळवण्यासाठी मेहनत जितकी महत्त्वाची आहे, तितकीच ती जपण्यासाठी शिस्त, संयम आणि योग्य निर्णय आवश्यक आहेत. त्यामुळे अहंकार आणि फिजूलखर्ची टाळा आणि कमाईचा मार्गही योग्य ठेवा.

chanaky niti

|

Sakal

रात्री लवंग का खावी? शरीरात काय बदल होतात?

Eat Cloves at Night

|

Sakal

येथे क्लिक करा