Aarti Badade
आचार्य चाणक्य यांच्या मते, आयुष्यात आर्थिक स्थैर्य मिळवायचं असेल तर बचत, संयम आणि आर्थिक शिस्त या तीन गोष्टींची सवय लावणं गरजेचं आहे.
chanaky niti
Sakal
चाणक्यांच्या मते, कितीही कमाई असली तरी त्यातील काही रक्कम नियमितपणे बाजूला काढली पाहिजे, कारण छोटी बचतच भविष्यात मोठी जमापुंजी बनू शकते.
chanaky niti
sakal
समजा, तुम्ही महिन्याला १०० रुपये कमवत असाल, तर त्यातील २५ रुपये बचतीसाठी ठेवावेत, असा बचतीचा साधा विचार चाणक्य नीतीमध्ये मांडण्यात आला आहे.
पैसे हातात आले की अनेकदा अनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा मोह होतो, मात्र प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याऐवजी गरज ओळखून खर्च करणं महत्त्वाचं आहे.
खरेदी करताना स्वतःवर नियंत्रण ठेवणं आणि अनावश्यक खर्च टाळणं आवश्यक आहे, कारण पैशांचा योग्य वापर केल्यास भविष्यातील आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात.
chanaky niti
Sakal
उत्पन्न, खर्च आणि बचत यांचं योग्य नियोजन करणं म्हणजे आर्थिक शिस्त होय, त्यामुळे प्रत्येक महिन्याचं बजेट ठरवून त्यानुसार खर्च करण्याची सवय लावा.
chanaky niti
Sakal
नियमित बचत, खर्चावर नियंत्रण आणि आर्थिक शिस्त या तीन सवयी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असा चाणक्य नीतीचा संदेश आहे.
Chanakya Niti
Sakal
chanderi fort
Sakal