Aarti Badade
आचार्य चाणक्य म्हणतात, "माणसाचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नसून त्याच्या आतच असतो." तुमच्या काही सवयीच तुम्हाला विनाशाकडे नेतात.
Chanakya Niti
Sakal
राग हा विवेकाचा शत्रू आहे. रागात घेतलेला कोणताही निर्णय नंतर पश्चात्तापाला कारणीभूत ठरतो. रागाच्या भरात नोकरी सोडणे किंवा नाते तोडणे ही स्वतःची मोठी हानी आहे.
Chanakya Niti
Sakal
कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे धोक्याचे आहे. आचार्य चाणक्य सांगतात की, अंधविश्वासामुळे कोणीही पाठीत खंजीर खुपसू शकतो. विश्वासात नेहमी जागरूकता ठेवा.
Chanakya Niti
Sakal
तुमच्या कमकुवत बाजू (Weaknesses) कोणालाही सांगू नका. आज जो तुमचा मित्र आहे, तो उद्या शत्रू बनून याच माहितीचा वापर तुमच्या विरोधात हत्यार म्हणून करू शकतो.
Chanakya Niti
Sakal
योग्य वेळी योग्य पाऊल न उचलणे हा स्वतःशी केलेला गुन्हा आहे. एकदा गेलेली संधी पुन्हा येत नाही, त्यामुळे संधी मिळताच निर्णय घेण्याची क्षमता विकसित करा.
Chanakya Niti
Sakal
जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर: रागात शांत राहा, विश्वास ठेवताना सावध राहा, स्वतःची गुपिते जपून ठेवा आणि संधी ओळखा.
Chanakya Niti
Sakal
१. अनियंत्रित राग २. अतिविश्वास ३. गुपिते सांगणे ४. निर्णय घेण्यास उशीर. हे चारही गुण मनुष्याला अधोगतीकडे नेतात.
Chanakya Niti
Sakal
आचार्य चाणक्यांच्या या धोरणांचे पालन केल्यास तुम्ही स्वतःचा शत्रू होण्यापासून वाचू शकता आणि जीवनात प्रगती करू शकता.
Chanakya Niti
Sakal