Chanakya Niti: आयुष्यात 'या' ४ लोकांना कधीही करू नका मदत! अन्यथा करावा लागेल पश्चात्ताप

Anushka Tapshalkar

चाणक्य नीती काय सांगते?

आचार्य चाणक्यांनी ‘चाणक्य नीती’मध्ये जीवनाबाबत अनेक महत्त्वाचे विचार मांडले आहेत. गरजूला मदत करावी, मात्र प्रत्येकाला मदत करणे योग्य नसते, असे ते सांगतात.

Chanakya Niti

|

sakal

मूर्ख व्यक्तीला मदत करू नका

चाणक्यांच्या मते, मूर्ख व्यक्तीला कितीही मदत केली तरी त्याचा योग्य फायदा होत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना मदत करण्यापूर्वी विचार करावा.

Chanakya Niti

|

Sakal

स्वार्थी लोकांपासून सावध राहा

स्वार्थी व्यक्ती स्वतःचा फायदा पाहतात आणि तुमच्या मदतीची परतफेड करतीलच असे नाही. त्यामुळे अशा लोकांना मदत करताना सावध राहावे.

Chanakya Niti

|

sakal

कृतघ्न व्यक्तींना मदत नको

चाणक्य नीतीनुसार, उपकारांची जाणीव नसलेल्या व्यक्तींना वारंवार मदत करू नये. असे लोक पुढे तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकतात.

Chanakya Niti

|

sakal

व्यसनाधीन व्यक्तींबाबत सावध राहा

व्यसनाधीन व्यक्तींना पैसे किंवा वस्तू देऊन मदत केल्याने त्यांच्या व्यसनाला प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींना मदत करताना योग्य मार्ग निवडावा.

Chanakya Niti

|

sakal

मदत करण्याआधी विचार करा

चाणक्यांच्या मते, गरजूला मदत करावी; मात्र समोरची व्यक्ती मदतीचा योग्य उपयोग करेल का, याचा विचार आधी करावा.

Chanakya Niti

|

sakal

मदत करा, पण योग्य व्यक्तीला!

चाणक्य नीतीनुसार, गरजू आणि प्रामाणिक व्यक्तींना मदत करा; मात्र तुमच्या मदतीचा गैरफायदा घेणाऱ्यांपासून सावध राहा.

Chanakya Niti

|

sakal

Chanakya Niti: लग्नाआधी मुलाचा पगार नाही, 'या' ५ गोष्टी पाहा; आयुष्यभर पश्चात्ताप होणार नाही!

Chanakya Niti

|

Sakal

आणखी वाचा