Chanakya Niti: लग्नाआधी मुलाचा पगार नाही, 'या' ५ गोष्टी पाहा; आयुष्यभर पश्चात्ताप होणार नाही!

Anushka Tapshalkar

लग्नाचा निर्णय घेताना...

लग्न ठरवताना मुलाचा पगार, नोकरी किंवा व्यक्तिमत्त्व पाहून लगेच निर्णय घेऊ नका. भविष्यात पश्चात्ताप टाळायचा असेल, तर जोडीदाराच्या स्वभावातील या ५ गोष्टी आधी समजून घ्या.

wedding

|

sakal

इतरांशी वागणूक

तो फक्त तुमच्याशी कसा वागतो हे पाहू नका. आई-वडील, मित्र, सहकारी आणि इतरांशी बोलताना त्याचा दृष्टिकोन कसा असतो, हेही पाहा. इतरांचा आदर करणं त्याच्या स्वभावाबद्दल बरंच काही सांगतं.

Chanakya Niti

|

Sakal

कठीण प्रसंगातील वागणूक

आनंदाच्या क्षणी प्रत्येकजण चांगला वागतो; पण अडचणीच्या वेळी स्वभावाची खरी ओळख होते. संकटात तो शांतपणे मार्ग काढतो की राग, वाद आणि दोषारोप करतो, हे आवर्जून पाहा.

Chanakya Niti

|

Sakal

जबाबदारीची जाणीव

फक्त चांगला पगार म्हणजे चांगला जोडीदार असं नाही. तो काम, घर आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या किती गांभीर्याने घेतो? भविष्यासाठी नियोजन करतो का? या गोष्टी समजून घ्या.

Chanakya Niti

|

ESakal

महिलांबद्दलचा दृष्टिकोन

तो महिलांच्या मतांचा आणि स्वातंत्र्याचा आदर करतो का? तुमच्या करिअरला, निर्णयांना आणि वैयक्तिक आवडीनिवडींना महत्त्व देतो का? नात्यात समानता आणि परस्पर आदर असणं महत्त्वाचं आहे.

Chanakya Niti

|

ESakal

राग आणि वाईट सवयी

त्याला रागावर नियंत्रण ठेवता येतं का, हे तपासा. सतत खोटं बोलणं, जुगार, अतिमद्यपान, अपमानास्पद बोलणं किंवा धमकावणं अशा सवयींकडे दुर्लक्ष करू नका. ही भविष्यातील नात्यासाठी धोक्याची चिन्हं असू शकतात.

Chanakya Niti

|

ESakal

समजून घ्या, मगच निर्णय घ्या!

आचार्य चाणक्यांच्या शिकवणीनुसार व्यक्तीचा स्वभाव, चारित्र्य आणि गुण यांना महत्त्व आहे. त्यामुळे केवळ पैसा किंवा बाह्य व्यक्तिमत्त्वावरून लग्नाचा निर्णय घेऊ नका. एकमेकांना समजून घ्या, मोकळेपणाने संवाद साधा आणि प्रत्यक्ष वागणुकीचे निरीक्षण करा.

Chanakya Niti

|

ESakal

प्रत्येक वेळी तुमचं मन जिंकणारी व्यक्ती विश्वासू असतेच असं नाही; ओळखा ७ संकेत!

Chanakya Niti

|

Sakal

आणखी वाचा