Shubham Banubakode
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राने जीवनाच्या प्रत्येक पैलूवर मार्गदर्शन केले आहे. त्यांनी काही स्त्रियांच्या स्वभावाबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
चाणक्य नीतिनुसार, दुष्ट आणि नीच स्वभावाची स्त्री विश्वासास पात्र नसते. अशा महिलेल्या इतर पुरुषांप्रती आकर्षण असते. तिच्या इच्छांमध्ये तिचा पतीच सर्वात मोठा अडथळा ठरतो, ज्यामुळे ती त्याला शत्रू मानते.
चाणक्य सांगतात की, केवळ बाह्य सौंदर्यावर विश्वास ठेवणे ही मोठी चूक आहे. स्त्रीच्या सौंदर्यापेक्षा तिचे गुण, संस्कार आणि शिक्षणाला प्राधान्य द्यावे. सौंदर्य तात्पुरते असते, पण गुण आणि संस्कार कायम टिकतात.
चाणक्य नीतिनुसार, जी स्त्री धर्म आणि कर्म यांच्यावर श्रद्धा ठेवत नाही, तिच्यावर विश्वास ठेवू नये. अशी स्त्री नैतिक मूल्यांपासून दूर असते, ज्यामुळे तिच्या कृतींमुळे कुटुंबाला हानी पोहोचू शकते.
चाणक्य म्हणतात, लालची स्वभावाची स्त्री अत्यंत धोकादायक असते. तिचा लोभ घरातील शांती नष्ट करते आणि कधी कधी संपूर्ण कुटुंबाच्या नाशाचे कारण ठरते. अशी स्त्री स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.
अहंकारी स्त्री माता सरस्वती आणि लक्ष्मी दोघींनाही नाराज करते, असे चाणक्य सांगतात. अशी स्त्री आपल्या ज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग करू शकत नाही. तिचा अहंकार घरातील सुख आणि समृद्धी नष्ट करतो.
चाणक्य यांनी सांगितलेली ही तत्त्वे आजही तितकीच प्रासंगिक आहेत. स्त्रीच्या चरित्र, संस्कार आणि नीतिमत्तेवर आधारित नाते टिकाऊ असते. चाणक्य नीती जीवनात योग्य जोडीदार निवडण्यासाठी आणि सुखी कुटुंबासाठी मार्गदर्शन करते.