Shubham Banubakode
चाणक्य यांनी एक श्लोक लिहिला आहे, ज्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे चार गुण – आहार, लज्जा, साहस आणि काम भावना – यांचे वर्णन केले आहे.
श्लोक- स्त्रीणां द्विगुण आहारो लज्जा चापि चतुर्गुणा । साहसं षड्गुणं चैव कामश्चाष्टगुणः स्मृतः ॥१७॥
श्लोकानुसार, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये आहार दुप्पट , लज्जा चारपट, धैर्य सहापट, काम भावना आठपट असते.
चाणक्य म्हणतात, स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त भोजनाची गरज असते, कारण त्या घरकाम, मुलांची काळजी यांसारखी शारीरिक कामे जास्त करतात.
स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त लाजतात. त्या त्यांच्या भावना आणि इच्छा सहसा व्यक्त करत नाहीत. त्या कुटुंबाच्या मर्यादांचे पालन करतात.
स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा सहापट जास्त धैर्य असते, म्हणून त्यांना शक्तीचा स्वरूप मानले जातात. त्या कठीण परिस्थितीचाही हिमतीने सामना करतात.
चाणक्य सांगतात, स्त्रियांमध्ये काम भावना पुरुषांपेक्षा आठपट जास्त असते. पण त्यांच्या भावना उघडपणे सांगत नाही.
स्त्रिया त्यांच्या सहनशक्तीने कुटुंबाला जोडून ठेवतात. त्या धर्म आणि संस्कारांचे पालन करत कुटुंबाची काळजी घेतात, ज्यामुळे त्या पुरुषांपेक्षा खास ठरतात.