Anushka Tapshalkar
चाणक्य नीतीत निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक पाऊल उचलण्याचा सल्ला दिला आहे. आणि म्हणूनच कोणतेही काम करण्यापूर्वी स्वत:ला काही महत्त्वाचे प्रश्न विचारणं गरजेचं आहे, असं चाणक्य सांगतात.
Chanakya Niti
ESakal
आपण कोणतेही काम का करतोय, हे आधी स्पष्ट असणे महत्त्वाचे आहे. उद्देश समजला की निर्णय घेताना योग्य दिशा मिळते.
Chanakya Niti
ESakal
प्रत्येक निर्णयाचे काही ना काही परिणाम होतात. संभाव्य फायदे, नुकसान आणि जोखीम आधीच विचारात घेतल्यास चुकीचे निर्णय टाळता येतात.
Chanakya Niti
ESakal
याचा अर्थ फक्त स्वतःवर विश्वास ठेवणे नाही. आपल्याकडे आवश्यक ज्ञान, कौशल्य, साधने आणि सातत्य आहे का, याचे प्रामाणिक मूल्यमापन करणे महत्त्वाचे आहे.
Chanakya Niti
ESakal
आजच्या वेगवान जीवनात लगेच निर्णय घेण्याचा दबाव असतो. मात्र, चाणक्यांचा संदेश सांगतो की थोडा विचार करून घेतलेला निर्णय अधिक परिणामकारक ठरू शकतो.
Chanakya Niti
ESakal
नवीन व्यवसाय सुरू करणे, करिअर बदलणे, शिक्षणाची दिशा ठरवणे किंवा आर्थिक निर्णय घेणे— प्रत्येक ठिकाणी हे तीन प्रश्न उपयोगी पडू शकतात.
Chanakya Niti
ESakal
चाणक्यांच्या शिकवणीत रणनीती, शिस्तबद्ध नियोजन आणि दूरगामी परिणामांचा विचार यांना महत्त्व दिले आहे. त्यांच्या विचारांचा संबंध अर्थशास्त्र आणि चाणक्य नीतीशी जोडला जातो.
Chanakya Niti
ESakal
पुढचे कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी स्वतःला हे प्रश्न विचारा, कारण योग्य प्रश्न विचारणे हीच योग्य निर्णयाची पहिली पायरी आहे.
Chanakya Niti
ESakal
Chanakya Success Tips
Sakal