'या' 7 लोकांना चुकूनही देऊ नका सल्ला, होईल तुमचे मोठे नुकसान

Yashwant Kshirsagar

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांची निती जीवन यशस्वी बनवण्यासाठी मार्गदर्शक ठरते. ते म्हणतात की काही लोकांना सल्ला देणे नुकसानकारक आहे. चला तर मग सल्ला कुणाला देऊ नये हे जाणून घेऊया.

Chanakya Advice | esakal

मुर्ख व्यक्ती

चाणक्य म्हणतात की मूर्ख लोकांना सल्ला देऊ नये, कारण ते याचे पालन करत नाहीत. तुमच्या सल्ल्याचा चुकीचा अर्थ काढू शकतात. यामुळे नंतर वाद होऊ शकतो. मुर्खांना सल्ला देणे म्हणजे वेळ वाया घालविणे.

Chanakya Advice | esakal

अहंकारी व्यक्ती

जी व्यक्ती आपली बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे असे मानतो त्याला सल्ला देणे व्यर्थ आहे असे चाणक्य सांगतात, कारण असा व्यक्ती तुम्हाला तुच्छ लेखतो. त्यामुळे तुमचा अपमान होतो आणि वेळही वाया जातो.

Chanakya Advice | esakal

रागीट व्यक्ती

रागीट व्यक्ती तुमचा सल्ला ऐकण्याऐवजी तुमच्यावरच भडकू शकतो. चाणक्य निती सांगते की, अशा लोकांना सल्ला दिल्याने तणाव वाढू शकतो.

Chanakya Advice | esakal

धोकेबाज व्यक्ती

धोकेबाज व्यक्ती तुमच्या सल्ल्याचा चुकीचा उपयोग करु शकतो. त्यामुळे त्याला सल्ला देणे म्हणजे संकट निर्माण करणे होय.

Chanakya Advice | esakal

आळशी व्यक्ती

आळशी व्यक्ती सल्ला घेतो पण तो अंमलात आणत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला सल्ला देणे म्हणजे पाण्यात मीठ मिसळण्यासारखे आहे.

Chanakya Advice | esakal

ईर्ष्या असणारी व्यक्ती

अशी व्यक्ती दुसऱ्याची प्रगती पाहून जळते. अशा व्यक्तीला सल्ला दिला तर तो तुमच्या सफलतेवर आणखी जळते.

Chanakya Advice | esakal

अनैतिक व्यक्ती

अनैतिक व्यक्ती कोणाचीही पर्वा करत नाही. त्यामुळे त्याला सल्ला देणे म्हणजे चुकीच्या मार्गाने जाणे, त्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो.

Chanakya Advice | esakal

महिलांनाच नाही तर पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, वेळीच ओळखा 'ही' लक्षणे

Symptoms Of Male Breast Cancer | esakal
येथे क्लिक करा