चांगल्या लोकांचीच फसवणूक! चाणक्य नीती सांगते; स्वार्थी लोकांची ओळख अशी करा

Aarti Badade

चांगुलपणाचा गैरफायदा

चाणक्य नीतीमध्ये मानवी स्वभाव आणि व्यवहार याबद्दल उपयुक्त शिकवण आहे. अनेकदा काही लोक आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात आणि आपल्याला फसवू शकतात.

Chanakya Niti for Selfish People

|

Sakal

स्वार्थासाठी जवळ येणारे लोक

जे लोक फक्त त्यांच्या कामासाठी तुम्हाला संपर्क करतात, पण तुमचं काही काम असेल तर दूर राहतात—ते केवळ स्वार्थासाठी तुमच्याजवळ आलेले असतात.

Chanakya Niti for Selfish People

|

Sakal

तुमच्या वेळेची किंमत न करणारे

नेहमी तुमच्याकडून मदत मागणारे, पण कधीही तुमचा आदर न करणारे लोक खरे मित्र नसतात. ते तुमच्या वेळेची किंमत करत नाहीत.

Chanakya Niti for Selfish People

|

Sakal

पाठीमागून वाईट बोलणारे

समोर गोड बोलून मागे बदनामी करणारे लोक सर्वात धोकादायक असतात. चाणक्य म्हणतात, अशा लोकांपासून जितके दूर राहाल, तितके चांगले.

Chanakya Niti for Selfish People

|

Sakal

यशात आनंद न मानणारे

तुम्ही यशस्वी झालात की ज्यांना चिडचिड होते किंवा तुलना करून तुम्हाला कमी दाखवतात, ते तुमचे खरे समर्थक नसतात.

Chanakya Niti for Selfish People

|

Sakal

शब्दाला कधीही न उतरणारे

वारंवार आश्वासन देऊनही ते कधीही पाळत नाहीत. चाणक्य नीती सांगते, ज्यांचा शब्द पक्का नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

Chanakya Niti for Selfish People

|

Sakal

तुमच्या मर्यादा ओलांडणारे

जे लोक तुमच्या भावना, वेळ, पैसा किंवा मेहनतीचे शोषण करतात, ते स्वार्थी असतात. अशा लोकांपासून त्वरित अंतर ठेवणे (मर्यादा ओलांडू न देणे) नेहमीच योग्य आहे.

Chanakya Niti for Selfish People

|

Sakal

सांगलीचा अभिमान! जत शहरातील हा 'किल्ला’ सांगतो मराठा साम्राज्याची गौरवकथा!

Sangali Ramgad Fort History

|

Sakal

येथे क्लिक करा