Anushka Tapshalkar
काही लोक भावनिक प्रतिक्रिया मिळवून इतरांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी रागावणे किंवा वाद घालणे टाळा. शांत राहा आणि त्यांच्या प्रत्येक कृतीला लगेच प्रतिक्रिया देऊ नका.
Chanakya Niti
sakal
समोरची व्यक्ती स्वतःला तुमच्यापेक्षा हुशार समजत असेल, तर प्रत्येक वेळी तिला चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करू नका. शांतपणे तिचे बोलणे ऐका. त्यामुळे तिच्या विचारांची आणि वागण्याची पद्धत समजून घेता येईल.
Chanakya Niti
Sakal
मॅनिप्युलेटर अनेकदा तुमच्या वैयक्तिक गोष्टींचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू शकतात. त्यामुळे तुमच्या योजना, कमकुवत बाजू आणि खासगी माहिती प्रत्येकासोबत शेअर करू नका. गरजेपुरतेच बोला.
Chanakya Niti
Sakal
काही लोकांना स्वतःचेच म्हणणे खरे वाटते. अशा वेळी त्यांच्याशी सतत वाद घालण्यापेक्षा त्यांच्या बोलण्याकडे शांतपणे लक्ष द्या. त्यांच्या कृतींमधून हेतू समजून घ्या आणि योग्य वेळी विचारपूर्वक निर्णय घ्या.
Chanakya Niti
Sakal
मॅनिप्युलेटर अनेकदा राग, भीती किंवा अपराधीपणाची भावना निर्माण करून आपल्यावर नियंत्रण मिळवतात. अशा वेळी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. शांत राहून स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा.
Chanakya Niti
Sakal
कोणी वारंवार तुमच्यावर दबाव टाकत असेल, तर त्याला स्पष्टपणे नकार द्यायला शिका. प्रत्येक गोष्ट मान्य करणे किंवा सतत स्पष्टीकरण देणे गरजेचे नाही. स्वतःचा स्वाभिमान आणि वेळ यांना महत्त्व द्या.
Chanakya Niti
Sakal
दुसऱ्याच्या वागण्यावर तुमचे नियंत्रण नसते; पण तुम्ही कशी प्रतिक्रिया देता, हे तुमच्या हातात असते. समोरच्याच्या प्रत्येक डावाला बळी न पडता स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. हाच अशा लोकांवर मात करण्याचा खरा मार्ग आहे.
Chanakya Niti
Sakal
Chanakya Niti
sakal