Shubham Banubakode
आचार्य चाणक्य महान भारतीय अर्थशास्त्री आणि राजनेते होते. त्यांची निती आजच्या कॉर्पोरेट जगात यशस्वी होण्यासाठीही मार्गदर्शक ठरते.
ऑफिसमध्ये कधी, कसे आणि कोणासमोर बोलावे, याची समझ स्वत:मध्ये निर्माण करा.
ऑफिसमध्ये कोणताही प्रोजेक्ट किंवा टास्क हाती घेण्यापूर्वी त्याचे उद्दिष्ट, परिणाम आणि यशाची शक्यता तपासा.
योजना तयार झाल्यावर तसेच सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यावरच त्या कामाला सुरुवात करा.
स्वतःच्या चुका करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकणे चांगले. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच्या चुकांचं निरीक्षण करून स्वत:त्या चुका टाळा.
ऑफिसमध्ये स्वतःला सक्षम आणि कणखर दाखवा, जरी तुम्ही आतून तसे नसाल तरीही. अशी प्रतिमा तुम्हाला कॉर्पोरेट वातावरणात फायदेशीर ठरते.
ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रामाणिकपणा आणि चांगला व्यवहार ठेवा. कोणाशीही गैरव्यवहार टाळा.
जबाबदारीने काम करा, ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील. तसेच ऑफिसमध्ये तुमच्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
चाणक्यांच्या या नितीचं पालन करून कॉर्पोरेट विश्वात आपला ठसा उमटवा.