'या' जागी कधीच बोलू नका! मान-सन्मान टिकवण्यासाठी चाणक्यांनी दिलेत महत्त्वाचे सल्ले

Aarti Badade

महान विचारवंत आचार्य चाणक्य

थोर विचारवंत आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनात यश मिळवण्यासाठी आणि समाजात मान-सन्मान टिकवण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाची गुपिते सांगितली आहेत.

maintain self-respect Chanakya Niti

|

Sakal

दुसऱ्यांच्या भांडणात पडू नका

चाणक्यांच्या मते, जेव्हा दोन व्यक्तींचे भांडण सुरू असते, तेव्हा तिथे स्वतःचे मत मांडू नका; अशा ठिकाणी शांत राहणेच तुमच्या फायद्याचे असते.

maintain self-respect Chanakya Niti

|

sakal

मान-सन्मान गमावण्याची भीती

दुसऱ्यांच्या भांडणात विनाकारण हस्तक्षेप केल्यास तुम्ही स्वतः संकटात येऊ शकता आणि लोक तुमचा अनादर करण्याची शक्यता वाढते.

maintain self-respect Chanakya Niti

|

Sakal

स्वतःचे कौतुक होत असताना

जर एखाद्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जात असेल, तर तिथे स्वतःबद्दल अधिक बोलण्यापेक्षा नम्रपणे शांत राहणे अधिक प्रभावी ठरते.

maintain self-respect Chanakya Niti

|

Sakal

आत्मस्तुती ठरू शकते अपमानास्पद

तुमच्या कौतुकाच्या वेळी तुम्ही स्वतःच्या यशाबद्दल अधिक बढाया मारू लागलात, तर लोक तुमचा सन्मान करण्याऐवजी तुमचा अपमान करू शकतात.

maintain self-respect Chanakya Niti

|

Sakal

अज्ञानाबद्दल मौन बाळगा

जर एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असेल आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल, तर तिथे न बोलणेच शहाणपणाचे ठरते.

maintain self-respect Chanakya Niti

|

sakal

नकारात्मक चर्चेपासून दूर राहा

जिथे लोक दुसऱ्याबद्दल वाईट बोलत असतील किंवा निंदा करत असतील, अशा जागी मौन पाळल्यास तुमची प्रतिमा समाजात उजळ राहते.

maintain self-respect Chanakya Niti

|

Sakal

साताऱ्यातलं आंबेडकरांचे घर! याच वाड्यात गेलंय बाबासाहेबांचं बालपण

Babasaheb Ambedkar childhood Satara home

|

Sakal

येथे क्लिक करा