Shubham Banubakode
आचार्य चाणक्य यांनी अर्थशास्त्रासह अनेक ग्रंथ लिहिले. त्यांच्या चाणक्य नीतिमधील विचार आजही तितकेच प्रासंगिक आणि मार्गदर्शक आहेत.
चाणाक्यांच्या या ग्रंथात महिलांमधील चार गुणांचा उल्लेख आहे. त्यांच्यानुसार खालील चार गुण असणारी महिला घराला सर्व बनवते.
चाणक्य म्हणतात, जी स्त्री आपल्या जीवनसाथीच्या यशाचा आणि कर्तृत्वाचा अभिमान बाळगते आणि चुका सुधारण्यासाठी प्रेरित करते, ती खरी गुणी स्त्री आहे.
चाणक्य नीतिनुसार, वाईट प्रसंगी हिंमतीने साथ देणारी स्त्री जीवनातील संकटे दूर करते. अशा स्वभावामुळे घरात संकटे फार काळ टिकत नाहीत.
चाणक्य सांगतात, जी स्त्री आपल्या जीवनसाथीच्या रंग-रूपापेक्षा त्याच्या गुणांना महत्त्व देते, ती खरी समर्पित जीवनसंगिनी ठरते.
चाणक्य नीतिनुसार, जी स्त्री आपल्या जीवनात स्पष्ट लक्ष्य ठेवते आणि व्यर्थ गोष्टींवर वेळ वाया घालवत नाही, ती आदर्श जीवनसाथी ठरते.
चाणक्यांनी सांगितलेली ही चार गुणं महिलेला असाधारण बनवतात. अशा महिला आपल्या कुटुंबाला सुख, समृद्धी प्रदान करतात, ज्यामुळे घर खऱ्या अर्थाने स्वर्ग बनते.