'या' ३ लोकांपासून नेहमीच राहा सावध, चाणक्य नीती काय सांगते?

Mansi Khambe

व्यक्तींची संगत

मैत्री किंवा आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तींच्या संगतीचा माणसाच्या भविष्यावर आणि व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. ज्यामध्ये काही व्यक्तींमुळे आयुष्यावर चांगला परिणाम पडतो तर काहींमुळे अडचणींमध्ये वाढ होतात.

Chanakya Niti

|

ESakal

नीतीशास्त्र

यामुळेच चाणक्यांनी त्यांच्या नीतीशास्त्रामध्ये अशा काही लोकांचा उल्लेख केला आहे, ज्यांच्यापासून नेहमी अंतर राखलं पाहिजे.

Chanakya Niti

|

ESakal

चाणक्य

चाणक्यांच्या माहितीनुसार काही लोकांच्या सोबतीमुळे आयुष्यात समस्या, अपयश आणि तणाव निर्माण होतो. त्यामुळे अशा लोकांच्या संगतीने मानसिक, सामाजिक आणि आर्थिक नुकसानही होऊ शकते.

Chanakya Niti

|

ESakal

मूर्खाची संगत

आचार्य चाणक्यांच्या मते, मूर्खाची संगत कधीही फायदेशीर नसते. म्हणजेच अशी व्यक्ती जी विचार न करता निर्णय घेते आणि चुकीचे सल्ले देते. त्यामुळे त्यांचे विचार आणि निर्णय जवळच्या लोकांसाठी समस्या निर्माण करू शकतात.

Chanakya Niti

|

ESakal

निंदा करणारे

तसेच दुसऱ्यांची निंदा करणारे लोकांपासूनही दूर राहण्याचा सल्ला चाणक्य देतात. जी व्यक्ती आज इतरांबद्दल वाईट बोलतेय, ती उद्या तुम्हच्याबद्दलही वाईट बोलेल असे चाणक्यांचे मत आहे.

Chanakya Niti

|

ESakal

दुष्ट स्वभाव

आचार्य चाणक्य यांच्या मते, दुष्ट स्वभावाचे लोक जे स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचाही विश्वास तोडू शकतात, हे सर्वात धोकादायक असतात. गरज पडल्यास ते तुमची गुपिते उघड करू शकतात, तसेच कठीण काळात तुम्हाला सोडून जाऊ शकतात.

Chanakya Niti

|

ESakal

स्वार्थी लोक

स्वार्थी लोकांच्या मनात केवळ मैत्रीचे सोंग आणि मनात कपट, विश्वासघात दडलेला असतो. त्यामुळेच अशा लोकांना वेळेवर ओळखून त्यांच्यापासून दूर राहणं फायद्याचं ठरतं.

Chanakya Niti

|

ESakal

टीप

वरील माहिती चाणक्यांच्या नीतीशास्त्राच्या आधारे देण्यात आली आहे. 'सकाळ' अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Chanakya Niti

|

ESakal

एटीएममध्ये एका महिन्यात किती पैसे भरले जातात? हे कोण ठरवते?

ATM Cash Loading

|

ESakal

येथे क्लिक करा