Shubham Banubakode
चाणक्यनीतीत वैवाहिक जीवनातील नातेसंबंध आणि त्यामागील मानसशास्त्र यावर सविस्तर सिद्धांत मांडले आहेत.
विवाहित पुरुष काहीवेळा इतर महिलांकडे का आकर्षित होतात? यामागील कारणं चाणक्यनीतीत सांगितले आहेत.
चाणक्यनीतीनुसार, कमी वयात लग्न केल्याने जोडीदाराला पुरेसा वेळ आणि लक्ष मिळत नाही. करिअर आणि वैयक्तिक स्थिरतेच्या शोधात जोडीदाराकडे दुर्लक्ष होते, ज्यामुळे नंतर इतरांकडे आकर्षण वाढू शकते.
पती-पत्नीमधील शारीरिक संबंध समाधानकारक नसतील, तर नात्यात दुरावा येतो. चाणक्यनीतीनुसार, यामुळे वैवाहिक जीवनात बाधा येते.
मुलांच्या जन्मानंतर पत्नीचे सारे लक्ष मुलांकडे जाते, ज्यामुळे पतीला दुर्लक्षित वाटू शकते. चाणक्यनीतीनुसार, हा तात्पुरता दुरावा असतो.
काही पुरुष विवाहबाह्य संबंधांना योग्य समजतात, परंतु यामुळे विश्वासाचा बंध तुटतो. चाणक्यनीतीनुसार, विश्वास हा नात्याचा पाया आहे.
चाणक्यनीती सांगते की, पुरुष आणि महिलांचे परस्परांवरील आकर्षण स्वाभाविक आहे. परंतु, यावर नियंत्रण न ठेवल्यास नाते धोक्यात येते.