Shubham Banubakode
चाणक्य सांगतात, पतीने आपली कमाई, संपत्ती किंवा गुंतवणुकीची माहिती पत्नीला देऊ नये. यामुळे भविष्यातील नियोजन बिघडून खर्च वाढू शकतो.
पत्नीसमोर स्वत;ची कमजोरी उघड करू नये.त्यामुळे पत्नीचा विश्वास डगमगू शकतो. किंवा ती माहिती इतरांना सांगू शकते, ज्यामुळे पतीची प्रतिष्ठा कमी होते.
चाणक्य नीतीनुसार, जर पतीचा कोणी अपमान केला असेल, तर ती घटना पत्नीला सांगू नये. यामुळे पत्नीला मानसिक त्रास होऊ शकतो.
चाणक्य सांगतात, पतीने कोणतीही योजना किंवा रणनीती पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही, अगदी पत्नीलाही सांगू नये. यामुळे अपयश येण्याचा धोका संभवतो.
विवाहापूर्वी पतीचे कोणतेही प्रेमसंबंध असतील, तर ते पत्नीसमोर उघड करू नयेत. यामुळे वैवाहिक जीवनात संशय, तणाव आणि कलह निर्माण होऊ शकतो.
पतीने मित्रांच्या गोपनीय बाबी पत्नीला सांगू नयेत. पत्नी भावनिक प्रतिक्रिया देऊ शकते आणि या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवू शकते.