सकाळ डिजिटल टीम
२२ नोव्हेंबर १८३० साली जन्मलेल्या झलकारी बाई झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या 'दुर्गा दल' या महिला सैन्याच्या प्रमुख सेनापती होत्या.
Who Was Jhalkari Bai?
sakal
आईचे निधन झाल्यावर वडिलांनी त्यांना मुलासारखे सांभाळले; औपचारिक शिक्षण नसले तरी त्या घोडेस्वारी अन् शस्त्रास्त्रांच्या वापरात अतिशय निपुण होत्या.
Who Was Jhalkari Bai?
sakal
लहानपणीच जंगलातून लाकडे गोळा करताना बिबट्या समोर आला असता, झलकारी बाईंनी कुऱ्हाडीने त्याचा सामना करून त्याला जागीच ठार केले.
Who Was Jhalkari Bai?
sakal
गावातील व्यापाऱ्यांवर दरोडेखोरांनी हल्ला केला असता, झलकारी यांनी आपल्या शौर्याच्या जोरावर त्यांना पळून जाण्यास भाग पाडले.
Who Was Jhalkari Bai?
sakal
झाशीच्या राणीसोबत कमालीचे शारीरिक साम्य असणाऱ्या झलकारी बाईंना पाहून स्वतः राणी लक्ष्मीबाईही थक्क झाल्या होत्या.
Who Was Jhalkari Bai?
sakal
राणी लक्ष्मीबाईंनी त्यांना दुर्गा दलात सामील करून बंदूक, तोफखाना आणि तलवारबाजीचे विशेष प्रशिक्षण दिले.
Who Was Jhalkari Bai?
sakal
१८५७ मधील युद्धात दूल्हेराव नावाच्या सेनापतीने फितुरी करून किल्ल्याचा संरक्षित दरवाजा इंग्रजांसाठी उघडला.
Who Was Jhalkari Bai?
sakal
किल्ल्याचा पराभव निश्चित दिसताच झलकारी बाईंनी राणी लक्ष्मीबाईंना सुरक्षित बाहेर पडण्याचा सल्ला देऊन किल्ल्यातून बाहेर पाठवले.
Who Was Jhalkari Bai?
sakal
पती पूरन सिंह शहीद झाल्यावरही खचून न जाता, झलकारी यांनी राणीचा वेश परिधान करून इंग्रज जनरल ह्यू रोजच्या छावणीत प्रवेश केला.
Who Was Jhalkari Bai?
sakal
इंग्रज सेनापती जनरल ह्यूग रोज़ याने "तुला काय शिक्षा हवी?" असे विचारताच, "मला फाशी द्या!" असे ठणकावून सांगत त्यांनी आपल्या अथांग धैर्याचा परिचय दिला.
Who Was Jhalkari Bai?
sakal
पेशव्यांच्या मुलीला इंग्रजांनी का जाळले? पाहा १४ वर्षांच्या मैनावतीची थरारक कहाणी!
Mainavati Peshwa
sakal