Shubham Banubakode
तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने खळबळ उडाली होती.
ऋषीराज आपल्या मित्रांसोबत चार्टर्ड विमानाने बँकॉकला निघाला होता.
काही तासांतच त्याला परत आणण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे.
दरम्यान, चार्टर्ड विमान काय असतं? खर्च किती येतो? कोणत्या सुविधा मिळतात? तुम्हाला माहिती का?
चार्टर्ड विमान म्हणजे असं विमान जे प्रवाशांच्या मागणीनुसार उड्डाण भरतं.
चार्टर्ड विमानाचे भाडे प्रति तास १.५ लाखांपासून सुरू होते. विमानाच्य वैशिष्टानुसार दर वाढत जातात.
चार्टर्ड विमानात प्रायव्हेट लाउंज, जेवण, WiFi सह लक्झरी सुविधा मिळतात.
मुंबई, दिल्ली,चेन्नईसह मोठ्या शहरांत चार्टर्ड विमानासाठी खास टर्मिनल आणि लाउंज सुविधा उपलब्ध आहेत.
या विमानात ऑक्सिजन सिलेंडर, वेंटीलेटर आणि डॉक्टर असतात.
चार्टर कंपन्या वारंवार प्रवास करणाऱ्या लोकांसाठी मेंबरशिप आणि फ्लाइंग अवर्स बुक करण्याचा पर्याय देतात.