Shubham Banubakode
यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने पालक आणि लैंगिक संबंधांबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे.
या विधानानंतर रणवीर अलाहाबादियाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं आहे.
रणवीर अलाहाबादियाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
रणवीर अलाहाबादिया त्याच्या पॉडकास्ट, स्टायलिश लूक आणि फिटनेससाठी चर्चेत असतो.
कोट्यवधींची कमाई करणारा रणवीर २२व्या वर्षापासून यूट्यूबवर व्हिडिओ बनवत आहे.
२ जून १९९३ रोजी मुंबईत जन्मलेल्या रणवीरने मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.टेकचे शिक्षण घेतलं आहे.
वयाच्या २२व्या वर्षी त्याने यूट्यूब चॅनल सुरू केले होते.
तो ७ यूट्यूब चॅनेल चालवतो, त्यातील एक बिअरबिसेप्स आहे.
त्याच्या चॅनेलवर एक कोटीहून अधिक सब्सक्राइबर आहेत.
रणवीर अलाहाबादिया यूट्यूबच्या माध्यमातून ३५ लाख रुपयांहून अधिक कमावतो.
याशिवाय यूट्यूब जाहिराती, रॉयल्टी, ब्रँड प्रमोशन असे अनेक उत्पन्नाचे स्त्रोत आहेत.
२०२४ मध्ये त्याची एकूण संपत्ती ६० कोटी रुपये इतकी होती.
तो Monk Entertainment चा सह-संस्थापक देखील आहेत.
रणवीर अलाहाबादियाचे मुंबईत स्वतःचे घर आहे.
त्याच्याकडे स्कोडा कोडियाक कार आहे. ज्याची किंमत जवळपास ३९.९९ लाख रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.