फेब्रुवारीत उघडणार नशिबाचे दरवाजे! ‘या’ राशींना मिळणार यश, मान-सन्मान अन् धनलाभ

Aarti Badade

फेब्रुवारी २०२६

फेब्रुवारी महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत खास ठरणार आहे. कुंभ राशीत चार प्रमुख ग्रहांची युती होणार असून, यामुळे एक दुर्मिळ 'चतुर्ग्रही राजयोग' तयार होत आहे.

February Lucky zodiac signs

|

sakal

'चतुर्ग्रही राजयोग'?

कुंभ राशीत राहू आधीपासूनच आहे. ३ फेब्रुवारीला बुध, १३ फेब्रुवारीला सूर्य आणि २३ फेब्रुवारीला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करतील. हे चार ग्रह एकत्र आल्याने हा शक्तिशाली योग तयार होईल.

February Lucky zodiac signs

|

Sakal

मिथुन राशी

मिथुन राशीच्या जातकांसाठी हा राजयोग भाग्योदयाचा ठरेल. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात मोठा नफा आणि गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळेल.

February Lucky zodiac signs

|

Sakal

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी रखडलेली कामे मार्गी लागतील. जुने अडकलेले पैसे परत मिळतील. नवीन प्रकल्पांवर काम सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असून आर्थिक स्थिती सुधारेल.

February Lucky zodiac signs

|

Sakal

कुंभ राशी

हा राजयोग स्वतः कुंभ राशीतच तयार होत असल्याने या जातकांवर ग्रहांची विशेष कृपा असेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना यश मिळेल आणि करिअरमध्ये मोठी झेप घेता येईल.

February Lucky zodiac signs

|

Sakal

आर्थिक प्रगतीचे द्वार

या चतुर्ग्रही योगामुळे केवळ उत्पन्न वाढणार नाही, तर संपत्तीतही वाढ होईल. कर्जबाजारीपणातून सुटका होण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल.

February Lucky zodiac signs

|

sakal

तुमची मेहनत!

ग्रहांची साथ असताना कठोर परिश्रम घेतल्यास अशक्य गोष्टीही साध्य होतील. नशीब तुम्हाला साथ देणार आहे, फक्त संधीचे सोने करणे तुमच्या हातात आहे.

February Lucky zodiac signs

|

Sakal

ज्योतिषीय टीप

ग्रहांचे गोचर राशीनुसार फलदायी ठरते. तुमच्या कुंडलीतील इतर ग्रहांच्या स्थितीनुसार परिणामात बदल होऊ शकतो. अधिक मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

February Lucky zodiac signs

|

Sakal

बोलत नाही म्हणून दुर्लक्ष करू नका! शांत लोकांबद्दल चाणक्य नीतीचं धक्कादायक सत्य

Power of silence Chanakya Niti

|

Sakal

येथे क्लिक करा