बाळकृष्ण मधाळे
हैदराबाद शहरापासून अवघ्या १०० किलोमीटर अंतरावर, तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात वसलेलं छाया सोमेश्वर महादेव मंदिर हे सुमारे ८०० वर्षे जुनं असून, आजही त्याच्या गूढ रहस्यामुळं जगभरातील भाविक आणि संशोधकांचं लक्ष वेधून घेत आहे.
Chaya Someshwara Temple History
esakal
या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, दिवसभर एका खांबाची सावली (छाया) शिवलिंगावर फिरत राहते, मात्र त्या सावलीचा मूळ स्रोत आजवर कोणीही निश्चितपणे उलगडू शकलेला नाही.
Chaya Someshwara Temple History
esakal
हे मंदिर प्राचीन भारतीय वास्तुकला, खगोलशास्त्र आणि विज्ञानाच्या अद्वितीय ज्ञानाचे जिवंत उदाहरण मानले जाते.
Chaya Someshwara Temple History
esakal
इतिहासकारांच्या मते, दक्षिण भारतातील चोल (चोळ) साम्राज्यासारख्या बलाढ्य राजवंशांच्या संरक्षणामुळे येथील मंदिरे उत्तर भारतात झालेल्या व्यापक परकीय आक्रमणांपासून सुरक्षित राहिली. त्यामुळे येथील कलात्मकता, स्थापत्यशास्त्र आणि वैज्ञानिक चमत्कार आजही त्यांच्या मूळ स्वरूपात पाहायला मिळतात.
Chaya Someshwara Temple History
esakal
दिसायला साधे वाटणारे हे रहस्य प्रत्यक्षात अत्यंत गुंतागुंतीचे आहे. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगासमोर थेट कोणताही खांब नसतानाही शिवलिंगावर स्पष्टपणे खांबाची सावली पडते. विशेष म्हणजे, तो खांब शिवलिंग आणि सूर्याच्या थेट रेषेतही नाही.
Chaya Someshwara Temple History
esakal
तज्ज्ञांच्या मते, मंदिर संकुलाबाहेरील खांबांची मांडणी, कोन आणि अंतर इतके अचूक आहे की सूर्याच्या हालचालींसोबत खांबांच्या परस्पर सावल्या एकत्र येऊन शिवलिंगावर पडणारी ही अद्भुत सावली तयार होते.
Chaya Someshwara Temple History
esakal
मंदिराच्या भिंतींना ८०० वर्षांच्या कालावधीत काही भेगा पडल्या असल्या, तरी तेलंगणा सरकारने हाती घेतलेल्या संवर्धन आणि जतनाच्या कामामुळे या ऐतिहासिक वारशाला नवसंजीवनी मिळाली आहे.
Chaya Someshwara Temple History
esakal
नलगोंडा येथील पानगल बसस्थानकापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर सहज पोहोचण्याजोगे आहे.
Chaya Someshwara Temple History
esakal
छाया सोमेश्वर महादेव मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, विज्ञान आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम दर्शवणारे प्रतीक आहे, जे आजही आधुनिक विज्ञानाला आव्हान देत आहे.
Chaya Someshwara Temple History
esakal
Chhatrapati Sambhajinagar Tourism
esakal