जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांनी नटलेला 'हा' एकमेव जिल्हा; आग्र्यासारखाच सेम टू सेम बघायला मिळेल 'ताजमहाल'

बाळकृष्ण मधाळे

छत्रपती संभाजीनगर : पर्यटन वैभवाचा खजिना

छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे पाहण्यासाठी देश-विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. पानचक्की, मुघलकालीन दरवाजे, सोनेरी महल, बुद्ध लेणी, अजिंठा-वेरुळ लेणी अशा असंख्य ऐतिहासिक व धार्मिक स्थळांनी हा जिल्हा नटलेला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Tourism

|

esakal

दौलताबाद किल्ला

औरंगाबादपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर व वेरुळजवळ असलेला दौलताबाद (देवगिरी) किल्ला देखील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. त्याची अभेद्य रचना आणि ऐतिहासिक महत्त्व आजही थक्क करणारे आहे.

Chhatrapati Sambhajinagar Tourism

|

esakal

अजिंठा लेणी

औरंगाबादची ओळख ठरलेल्या अजिंठा लेणी या जागतिक वारसा स्थळामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापासून महापरिनिर्वाणापर्यंतचा जीवनप्रवास भित्तीचित्रांच्या माध्यमातून साकारलेला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Tourism

|

esakal

वेरुळ लेणी

वेरुळ (एलोरा) लेणी देखील तितकीच प्रसिद्ध आहेत. सन 1951 मध्ये भारत सरकारने वेरुळ लेणी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली. येथे हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मांची शिल्पकला एकाच ठिकाणी पाहायला मिळते.

Chhatrapati Sambhajinagar Tourism

|

esakal

सोनेरी महल

सोनेरी महल हा औरंगाबादमधील एक महत्त्वाचा ऐतिहासिक राजवाडा आहे. हा राजवाडा बुंदेलखंडच्या सरदाराने बांधला असून, तो पहारसिंगपुरा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारात स्थित आहे.

Chhatrapati Sambhajinagar Tourism

|

esakal

‘52 दरवाजांचे शहर’

औरंगाबादला (छत्रपती संभाजीनगर) ‘52 दरवाजांचे शहर’ म्हणूनही ओळखले जाते. मुघलकालीन भव्य दरवाजे आजही शहराच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात.

Chhatrapati Sambhajinagar Tourism

|

esakal

'बीबी का मकबरा'

छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेला ‘बीबी का मकबरा’ हा महाराष्ट्राचा ताजमहाल म्हणून ओळखला जातो. दिल्लीतील ताजमहालाच्या धर्तीवर उभारलेले हे स्मारक स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.

Chhatrapati Sambhajinagar Tourism

|

esakal

महाराष्ट्राचे पर्यटन वैभव

इतिहास, धर्म, संस्कृती आणि पर्यटन यांचा अनोखा संगम असलेले छत्रपती संभाजीनगर हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे पर्यटन वैभव ठरते. त्यामुळे आपण फिरायला जाण्याची योजना आखत असाल, तर हा जिल्हा पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहे.

Chhatrapati Sambhajinagar Tourism

|

esakal

Maharashtra Tourism : आयुष्यात एकदा तरी इथं फिरलाच पाहिजे! महाराष्ट्रातील टॉप 10 ठिकाणं पाहून थक्क व्हाल

Maharashtra Tourism

|

esakal

येथे क्लिक करा...