संध्याकाळी काहीतरी स्पेशल हवंय? बनवा चीज मिरची भजी

Aarti Badade

काहीतरी हटके आणि चविष्ट!

नेहमीची कांदा किंवा बटाटा भजी खाऊन कंटाळा आला असेल, तर या पावसाळी वातावरणात किंवा संध्याकाळच्या चहासोबत 'चीज मिरची भजी' हा एक उत्तम पर्याय आहे.

Crispy Cheese Stuffed Chilli Pakora

|

Sakal

मुख्य साहित्य

यासाठी तुम्हाला लागतील मोठ्या भावनगरी मिरच्या, किसलेले चीज, आले-लसूण-मिरची पेस्ट, बेसन, ओवा, आमचूर पावडर, कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल.

Crispy Cheese Stuffed Chilli Pakora

|

Sakal

मिरचीची तयारी

भावनगरी मिरच्या स्वच्छ धुवून मधून चिरा पाडून घ्या. सुरीच्या मदतीने त्यातील सर्व बिया काढून टाका, जेणेकरून मिरचीचा तिखटपणा कमी होईल.

Crispy Cheese Stuffed Chilli Pakora

|

Sakal

चविष्ट 'चीज स्टफिंग'

एका बाऊलमध्ये किसलेले चीज, आले-लसूण-मिरची पेस्ट, मीठ आणि आमचूर पावडर एकत्र करा. हे मिश्रण मिरच्यांमध्ये व्यवस्थित दाबून भरा.

Crispy Cheese Stuffed Chilli Pakora

|

Sakal

बेसनाचे बॅटर

बेसन पिठात ओवा, मीठ, कोथिंबीर आणि थोडे पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा. तळण्यापूर्वी त्यात चिमूटभर खाण्याचा सोडा घालून फेटून घ्या.

Crispy Cheese Stuffed Chilli Pakora

|

Sakal

खमंग तळणी

स्टफ केलेली मिरची बेसनाच्या मिश्रणात व्यवस्थित घोळवून घ्या आणि गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्या.

Crispy Cheese Stuffed Chilli Pakora

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा!

तयार आहेत तुमची 'चीज बर्स्ट' मिरची भजी! पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत याचा आस्वाद घ्या. मुलेही ही भजी आवडीने मागून खातील.

Crispy Cheese Stuffed Chilli Pakora

|

Sakal

जेवताना कच्चा कांदा खाणे 'या' लोकांसाठी ठरू शकतो घातक!

Raw onion Side Effects who should avoid

|

Sakal

येथे क्लिक करा