जेवताना कच्चा कांदा खाणे 'या' लोकांसाठी ठरू शकतो घातक!

Aarti Badade

कांदा

भारतीय जेवणात कच्चा कांदा सॅलड म्हणून आवडीने खाल्ला जातो. मात्र, काही विशिष्ट शारीरिक समस्या असलेल्या लोकांसाठी कच्चा कांदा खाणे त्रासाचे ठरू शकते.

Raw onion Side Effects who should avoid

|

Sakal

पचन

ज्यांना सतत गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो, त्यांनी कच्चा कांदा टाळावा. कांद्यातील घटकांमुळे पोटात जडपणा आणि अस्वस्थता वाढू शकते.

Raw onion Side Effects who should avoid

|

Sakal

ॲसिडिटी आणि जळजळ

कच्च्या कांद्यामुळे पोटातील आम्लाची (Acid) पातळी वाढते. ज्यांना वारंवार छातीत जळजळ, आंबट ढेकर किंवा पित्ताचा त्रास होतो, त्यांच्यासाठी कांदा हानिकारक ठरू शकतो.

Raw onion Side Effects who should avoid

|

Sakal

अ‍ॅलर्जी

काही लोकांना कच्चा कांदा खाल्ल्यावर त्वचेवर लाल पुरळ येणे, खाज सुटणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशा अ‍ॅलर्जीची लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी कांदा खाणे त्वरित थांबवावे.

Raw onion Side Effects who should avoid

|

Sakal

रक्त

कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. जे लोक आधीच रक्त पातळ करण्याची औषधे घेत आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कच्चा कांदा खाऊ नये.

Raw onion Side Effects who should avoid

|

Sakal

शस्त्रक्रिया होणार असल्यास

तुमची नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल किंवा येत्या काही दिवसांत होणार असेल, तर कच्चा कांदा खाणे टाळा. यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान किंवा नंतर जास्त रक्तस्राव होण्याचा धोका असतो.

Raw onion Side Effects who should avoid

|

Sakal

योग्य प्रमाणात सेवन करा

कच्चा कांदा खाण्यापूर्वी आपल्या शरीराची स्थिती ओळखा. वरीलपैकी कोणताही त्रास असल्यास कांदा शिजवून खाणे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम!

Raw onion Side Effects who should avoid

|

Sakal

महाग औषध घेताय? फक्त ‘या’ 3 भाज्या खाल्ल्या तरी लिव्हर राहील फिट

Best vegetables for liver health

|

Sakal

येथे क्लिक करा