ठिपके सारखे पण प्राणी वेगळे! कसा ओळखायचा बिबट्या, चित्ता आणि जग्वार मधला फरक?

Anushka Tapshalkar

बिबट्याचे हल्ले

सध्या अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यांची बातमी पाहायला मिळत आहे. त्यातही काही AI व्हिडीओ असल्याचं आढळून येत आहे.

Current Leopard Attacks

|

sakal

बिबट्या-चित्ता-जग्वारचा गोंधळ

अशात मात्र जिथे खरंच बिबट्या येतोय, तो बिबट्याचा आहे ना की चित्ता आहे की जग्वार याबद्दल अनेकांचा गोंधळ उडत आहे. पण काही गोष्टीत लक्षात ठेवल्या तर या तिघांमधला फरक ओळखता येणं सोपं होतं.

Confusion Between Leopard, Cheetah, Jaguar

|

sakal

बिबट्या

प्रामुख्याने आफ्रिका आणि आशिया खंडात बिबट्या आढळून येतो. बिबट्या दिसायला ताकदवान आणि अधिक मजबूत असतो.

Leopard

|

sakal

मुख्य फरक

बिबट्याच्या अंगावर काळ्या ठिकप्यांच्या मधली जागा रिकामी असते. तो झाडावर चढण्यात आणि रात्री शिकार करण्यात माहीर असतो.

How to Spot Leopard

|

sakal

चित्ता

जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी आशिया आणि आफ्रिका या दोन्ही खंडात आढळून येतो. चित्ता अंगकाठीने बिबट्यापेक्षा सडपातळ आणि कमी वजनाचा असतो आणि त्याला सहसा दिवसा शिकार करायला आवडते

Cheetah

|

sakal

मुख्य फरक

चित्त्याच्या अंगावर गोलाकार, स्पष्ट दिसणारे आणि एकसारखे काळे ठिपके असतात. तर त्याच्या डोळ्यांच्या आतल्या कोपऱ्यापासून ते तोंडापर्यंत अश्रू रेषा दिसून येतात.

How to Spot Cheetah

|

sakal

जग्वार

अल्फा मेल! सर्वात स्ट्रॉंग आणि घातक जग्वार हा मध्य आणि दक्षिण अमेरिका खंडात जास्त आढळतो. बांध्याने इतर दोघांपेक्षा भरभक्कम जग्वार भक्षाचे लचके तोडण्यातही पॉवरफुल असतो.

Jaguar

|

sakal

मुख्य फरक

याच्या अंगावर ठिपक्यांच्या गोलाकार कडांच्या बरोबर मध्ये एक लहान काळा ठिपका असतो. जग्वार बिबट्या आणि चित्तापपेक्षा जाड असला तरी त्याचे पाय आखूड असतात. आणि पाण्यात पोहण्यात तर हा एकदम पटाईत असतो.

How to Spot Jaguar

|

sakal

दिसायला अगदी उंदीर! पण हा आहे जगातील सर्वात छोटा प्राणी!

आणखी वाचा