जग जिंकणारा चंगेज खान भारतात का घुसू शकला नाही?

Shubham Banubakode

भारताच्या सीमेवर

इ.स. १२११ ते १२१६ दरम्यान चंगेज खान चीनमध्ये मोहिमा करत होता. पुढे जलालउद्दीनचा पाठलाग करत तो थेट भारताच्या सीमेवर पोहोचला.

Why Genghis Khan Could Not Invade India

|

esakal

सिंधूच्या काठावर युद्ध

चंगेज खानचं सैन्य संख्येने मोठं होतं. तरी जलालउद्दीनने पहिला हल्ला परतवून लावत मंगोल सैन्यासमोर कडवी लढत दिली.

Why Genghis Khan Could Not Invade India

|

esakal

जलालउद्दीनची उडी

मंगोलांनी तीन बाजूंनी घेरल्यानंतर जलालउद्दीनसमोर पळण्याचा मार्ग उरला नव्हता. अखेर त्याने घोड्यासह खोल सिंधू नदीत उडी घेतली.

Why Genghis Khan Could Not Invade India

|

esakal

चंगेज खान प्रभावित

जलालउद्दीनने नदी पार करून दुसरा किनारा गाठला. त्याची जिद्द पाहून चंगेज खानने तिरंदाजांना त्याच्यावर बाण न सोडण्याचा आदेश दिला.

Why Genghis Khan Could Not Invade India

|

esakal

दिल्लीच्या दिशेने

जलालउद्दीन दिल्लीच्या दिशेने निघाला. मात्र मंगोलांच्या भीतीमुळे सुलतान इल्तुतमिशने त्याला अधिकृत आश्रय देण्याचं धाडस केलं नाही.

Why Genghis Khan Could Not Invade India

|

esakal

लाहोर-मुल्तानवर हल्ला

चंगेज खानच्या दोन सैन्य तुकड्यांनी सिंधू पार करत लाहोर आणि मुल्तानवर हल्ले केले. मात्र पुढे जाणं त्यांच्यासाठी सोपं राहिलं नाही.

Why Genghis Khan Could Not Invade India

|

esakal

भारतीय उष्णता

मंगोल सैनिक थंड हवामानात वाढलेले होते. भारतातील प्रचंड उष्णतेने त्यांची दमछाक झाली आणि पुढची मोहीम चालवणं कठीण बनलं.

Why Genghis Khan Could Not Invade India

|

esakal

चाऱ्याची कमतरता

मंगोल सैन्याची ताकद घोडदळात होती. पण सिंध आणि मुल्तानमध्ये पाणी असूनही हजारो घोड्यांसाठी पुरेसा चारा उपलब्ध नव्हता.

Why Genghis Khan Could Not Invade India

|

esakal

आजारी सैनिक

सैनिक आजारी पडू लागले. पुढे जंगलं आणि डोंगराळ भाग होता, पण त्या प्रदेशाची पुरेशी माहिती नसल्याने चंगेजला मोठा धोका पत्करायचा नव्हता.

Why Genghis Khan Could Not Invade India

|

esakal

अपशकुन

सैनिकांना गेंडा दिसला, तो अपशकुन मानला गेला. अनेक अडचणींनी घेरलेल्या चंगेज खानने अखेर भारतातून परतण्याचा निर्णय घेतला.

Why Genghis Khan Could Not Invade India

|

esakal

मुघल साम्राज्यातील सर्वात प्रभावशाली महिला कोण?

Who was Maham Anga

|

esakal

हेही वाचा -