संतोष कानडे
श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी संपूर्ण देशामध्ये पिनकोड प्रणाली अस्तित्वात आणली. त्यांनी देशाची नऊ भौगोलिक विभागांमध्ये विभागणी केली.
उदाहरणाने समजून घेऊ, ४११००१ हा पुण्याचा पिनकोड आहे. त्यातला पहिला अंक ४ हा देशातील पश्चिम विभागासाठी आहे.
यात महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश होता. त्यामुळे महाराष्ट्रातील सगळे पिनकोड ४ ने सुरु होतात.
दुसरा अंक १ म्हणजे उपविभाग. महाराष्ट्रासाठी ४० ते ४४ हे आकडे आहेत. ४१ हा आकडे पुणे, अहिल्यानगर, आणि साताऱ्यासाठी आहे.
तिसरा अंक म्हणजे जिल्ह्याचं सॉर्टिंग आहे. पुण्यासाठी ४११ हा आकडे निश्चित करण्यात आलेला आहे.
पिनकोडमधले शेवटचे तीन अंक हे विशिष्ट पोस्ट ऑफिसचे असतात. ००१ हा पुण्याच्या मुख्य पोस्ट ऑफिसचा GPO नंबर आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण ७४६ पोस्ट ऑफिसेस आहेत आणि ते वेगवेगळ्या पिनकोडशी जोडलेले आहेत. एकाच पिनकोडअंतर्गत अनेक गावे, कार्यालयं असतात.
जसं पुणे शहरासाठी शेवटचे ती ११०, हवेलीसाठी ६०, जुन्नरसाठी ७०, खेडसाठी ६७, भोरसाठी ६५, बारामतीसाठी ५६, इंदापूरसाठी ५२, मावळसाठी ४४, मुळशीसाठी ३६ असे क्रमांक आहेत.
पुण्याचा विस्तार एवढ्या झपाट्याने होतोय की, साधारण दर दहा वर्षांनी नवीन भागासाठी नवीन पिनकोड जारी करावा लागतो.