Aarti Badade
श्वास घेताना छातीत दुखणे हे स्नायूंचा ताण, ऍसिडिटी, फुफ्फुसाचा संसर्ग किंवा हृदयाशी संबंधित समस्यांमुळे होऊ शकते.
जास्त व्यायाम केल्याने किंवा जड वस्तू उचलल्याने छातीमधील स्नायू ताणले जाऊ शकतात, ज्यामुळे श्वास घेताना दुखते.
गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स रोग (GERD) मध्ये ऍसिड अन्ननलिकेत परत येते, ज्यामुळे छातीत जळजळ आणि दुखणे जाणवते.
न्यूमोनिया किंवा ब्राँकायटिससारख्या फुफ्फुसाच्या संसर्गामुळे श्वास घेताना छातीत दुखू शकते.
हृदयविकाराचा झटका किंवा इतर हृदयविकारामुळे श्वास घेताना छातीत दुखणे हे एक गंभीर लक्षण असू शकते.
फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी (पल्मोनरी एम्बोलिझम) तयार झाल्यास श्वास घेण्यास त्रास होतो आणि छातीत दुखते.
हृदयाच्या बाहेरील आवरणास सूज (पेरीकार्डिटिस) आल्यास श्वास घेताना छातीत वेदना जाणवू शकतात.
श्वास घेताना वाढणारे छातीत दुखणे, खोकला, श्वास घेण्यास त्रास, हृदयाचे ठोके वाढणे आणि चक्कर येणे ही सामान्य लक्षणे आहेत.
जर छातीत दुखणे २४ तासांपेक्षा जास्त काळ टिकले, किंवा श्वास लागणे, चक्कर येणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसल्यास, त्वरित डॉक्टरांना भेटा.
तात्पुरत्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही वेदनाशामक औषधे घेऊ शकता. ऍसिडिटीमुळे दुखत असल्यास, ऍसिडिटी कमी करण्यासाठी उपाय करा.
श्वास घेताना छातीत दुखणे हे गंभीर असू शकते, त्यामुळे योग्य वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.