Pranali Kodre
२४ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा दिग्गज कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या निवृत्तीने क्रिकेट चाहत्यांना विशेषत: कसोटी चाहत्यांना मोठा धक्का बसला.
२०१० साली पदार्पण केल्यानंतर जवळपास एक दशक पुजाराने भारतीय कसोटी संघातील तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती.
दरम्यान, गेल्या आठ महिन्यात निवृत्ती घेणारा पुजारा भारताचा चौथा दिग्गज खेळाडू ठरला.
पुजाराने त्याच्या कारकिर्दीत १०३ कसोटी सामन्यात ७१९५ धावा केल्या, ज्यात १९ शतकांचा आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे.
याआधी डिसेंबर २०२४ मध्ये भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
अश्विनने २८७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७६५ विकेट्स घेतल्या, ज्यात त्याच्या १०६ कसोटी सामन्यातील ५३७ विकेट्सचा समावेश आहे.
मे २०२५ मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
विराट कोहलीने कसोटीत १२३ सामन्यांत ३० शतके आणि ३१ अर्धशतकांसह ९२३० धावा केल्या.
रोहित शर्माने कसोटीत ६७ सामन्यांत १२ शतके आणि १८ अर्धशतकांसह ४३०१ धावा केल्या.
दरम्यान, २०१० ते २०२५ दरम्यान कसोटी क्रिकेट गाजवणारे चार भारतीय दिग्गज अचानक ८ महिन्याच्या कालावधीत निवृत्त झाल्याने कसोटीतील एका युगाचा अंत झाल्याच्या भावना क्रिकेट वर्तुळातून व्यक्त होत आहेत.