kimaya narayan
सध्या सगळीकडे चर्चा आहे ती विकी कौशलच्या छावा सिनेमाची. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित सिनेमाचा ट्रेलरही सगळ्यांना आवडला आहे.
ट्रेलर पाठोपाठ सिनेमाचा नवीन टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या टीझरने अल्पावधीत सगळ्यांची मनं जिंकली.
नवीन रिलीज झालेल्या टीझर मध्ये दमदार संवाद आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आक्रमकपणे लढलेल्या युद्धांची झलक पाहायला मिळत आहे.
"मराठो का अंत नहीं मुघलों के विनाश कि शुरुआत है", "हमें यकीन नहीं विश्वास है औरंगजेब का अंत होगा" और "आबासाहेब का सपना पुरा होगा" अशी जबरदस्त संवादफेक या टीझरमध्ये पाहायला मिळतेय.
तर युद्धाचे सीन, विकीच्या जबरदस्त ॲक्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
अंगावर काटा आणणारं पार्श्वसंगीत यावेळी ऐकायला मिळतं. त्यामुळे सगळ्यांनाच हे संगीत खूप आवडतंय.
तर शेवटी असलेल्या महाराणी येसूबाई आणि छत्रपती शंभूराजे यांच्यामधील सीन खूपच लक्ष वेधून घेतो.
14 फेब्रुवारीला 2025 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.