kimaya narayan
संगीत विश्वातील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा ‘ग्रॅमी अवॉर्ड्स 2025' पार पडला. यावेळी अमेरिकन रॅपर कान्ये वेस्टची पत्नी बियांका सेंसरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
बियांका ही ऑस्ट्रेलियन मॉडेल असून ती कायमच तिच्या वादग्रस्त आऊटफिट्समुळे लक्ष वेधून घेते.
ग्रॅमी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर बियांकाने नग्नावस्थेत लावली हजेरी लावली. तिच्या या रेड कार्पेट लूकमुळे सगळ्यांनाच धक्का बसला.
बियांकाने सुरुवातीला काळ्या रंगाचं जाड जॅकेट घातलं हॉट आणि रेड कार्पेटवर येताच तिने ते जॅकेट उतरवलं. तिने पारदर्शक कपडे घातले होते. तिचा हा लूक पाहून अनेकांना धक्का बसलाय.
पण रेड कार्पेटवरील फोटोशूट नंतर असं म्हटलं जात कि त्यांना अवॉर्ड शोच्या ठिकाणी येऊ दिलं नाही त्यांना हाकलून देण्यात आलं. बियांकाच्या आऊटफिटमुळे असा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय.
बियांकाचा आऊटफिट नाही तर टेलीचक्करच्या वृत्तानुसार त्यांना या सोहळ्याचं आमंत्रण नव्हतं.
बियांकाचे या लुकचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
अनेकांनी सोशल मीडियावर बियांकाच्या लूकवर टीका केली आहे.