Pranali Kodre
१९१७ मध्ये शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण लागू केले.
कोल्हापूर संस्थानामध्ये शिक्षण सक्तीचं आणि मोफत केले गेले. ही एक मोठी क्रांतीच होती!
शिक्षण न दिल्यास दंड!
मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना एक रुपया दंड होता. आजच्या काळात याची किंमत हजारोंमध्ये आहे!
फक्त आदेश नव्हे, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी!
शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे करताना कडक अंमलबजावणी केली.
"माझा हेतू आहे की, तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावे!" असे शाहू महाराजांनी म्हटले होते.
शिक्षण सक्तीमुळे पालकांनी मुलांना शाळेत पाठवायला सुरुवात केली.
शिक्षण सक्तीनंतर हजारो मुलांनी प्राथमिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
शाहू महाराजांचे चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे यांनी ही महत्त्वाची माहिती नोंदवून ठेवली आहे.
हा निर्णय बहुजन समाजासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरला. यामुळे समाजात समता आणि प्रगतीचा पाया रोवला गेला.