Aarti Badade
शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे 9 वर्षे मोगल, आदिलशाहा, सिद्दी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंच्या विरोधात लढत होते.
संभाजीराजे आणि मोगल फौजांच्या लढाईत, औरंगजेब सळो की पळो झाला. शेवटी त्याला पराभव स्वीकारावा लागला.
संभाजीराजे केवळ रणांगणातच नाही, तर राजनीतीतदेखील निपुण होते. पोर्तुगीज आणि मोगलांविरुद्ध त्यांनी एकत्र रणनीती आखली.
पोर्तुगीज आणि सिद्दी यांच्यावर वचक बसविण्यासाठी संभाजीराजांनी अरबांशी मैत्री केली, असे वा. सी. बेंद्रे नमूद करतात. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, ही त्यांची राजनीती होती.
संभाजीराजे प्रजेची देखभाल करत होते, दुष्काळग्रस्तांना मदत, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि महिलांच्या अधिकारांची काळजी घेत होते.
आपल्या महाराणीला सर्वाधिकार देणारे संभाजीराजे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. शिवरायांप्रमाणेच आपल्या राज्यातील आणि परराज्यातील महिलांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली.
छत्रपती संभाजी महाराज हे मराठीसह संस्कृत, फारसी, उर्दू, अरबी, ब्रज आणि इंग्रजी अशा अनेक भाषांचे जाणकार होते. इंग्रजीतून त्यांनी परकीयांशी संवाद व पत्रव्यवहार केले होते.
संभाजीराजेंची मोगल, आदिलशहा, सिद्दी, पोर्तुगीजांच्या विरोधातील लढाई राजकीय होती. धार्मिक नव्हती. ते कधीही, कोणाशीही धार्मिक द्वेषाने वागले नाहीत.
'बुधभूषण', 'नखशिख', 'नायिकाभेद' आणि 'सातसतक' हे ग्रंथ लिहिले. बुद्धिमत्ता आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व: ते अतिशय हुशार, कर्तबगार, दुरदृष्टी असलेले होते. विविध विद्या व कलांमध्ये पारंगत असलेल्या संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व सर्वगुणसंपन्न होते.