संभाजी महाराजांच्या जीवनाबद्दल जाणून घ्या 'या' अनोखी गोष्टी

पुजा बोनकिले

जन्म

संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.

स्वराज्याचे छत्रपती

वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी संभाजी महाराज स्वराज्याचे युवराज तर केवळ 23 व्या वर्षी स्वराज्याचे छत्रपती झाले.

मुघल दरबार

राजकारण अगदी कमी वयातच शिकण्याची संभाजी महाराजांची जबरदस्त इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मुघल दरबार आणि तिथं होणारं राजकारण कसं असतं हे अगदी बालपणीच पाहिलं होतं.

साहित्य

केवळ चौदाव्या-पंधराव्या वर्षी संभाजी राजांनी साहित्य, कविता यांच्यात रस घेतला आणि याच काळात छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित झाले.

आग्रा

शिवाजी महाराजांसोबत वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी संभाजी राजे आग्र्याला गेले होते. त्यानंतर आग्र्याहून सुटकेचा एकएक क्षण त्यांनी आपल्या पित्यासोबत अनुभवला.

संभाजीराजे

शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी छत्रपतींच्या गादीवर विराजमान झाले. रायगडावरच संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

राज्याभिषेक

16 जानेवारी 1681 रोजी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजींचा भव्य राज्याभिषेक झाला.

निधन

अशा या शूर राजाचे 11 मार्च 1689 रोजी निधन झाले.

पोटाच कोणत्या पदार्थांमुळे गॅसेस निर्माण होतात?

Sakal
आणखी वाचा