सकाळ डिजिटल टीम
पुरंदर किल्ला हा मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा किल्ला होता. हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे.
पुरंदर किल्ला दोन भागांमध्ये विभागलेला आहे. किल्ल्याचा खालचा भाग म्हणजे माची येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, जसे की पुरंद्रेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर आणि दिल्ली दरवाजा.
किल्ल्याचा वरचा भाग म्हणजे बालेकिल्ला येथे अनेक बुरुज आणि तटबंदी आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 1657 च्या साली पुरंदर किल्ल्यावर झाला.
पुरंदरचा तह हा 1665 साली झाला या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांना २३ किल्ले द्यावे लागले.
नाना फडणवीसांनी 1757 साली पुरंदर किल्ल्यावरून पेशवाईचा कारभार हाती घेतला.
ब्रिटिश राजवटीत पुरंदर किल्ला तुरुंग म्हणून वापरला जात होता.
बिनी दरवाजा, रामेश्वर मंदिर, पुरंदरेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा, भैरवगड, पुरंदर माची, केदारेश्वर, पद्मावती तळे, खन्दकडा,शेन्द्र्या बुरुज,कोकण्या बुरुज ही सर्व किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे आहेत
पुरंदर किल्ला हा पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असून सासवड शहरापासून किल्ला 30 मिनिटच्या अंतरावर आहे.किल्लापासून एका तासाची ट्रेकिंग करून तुम्ही वरती पोचल.
किल्लावर जाण्यासाठी टॅक्सी,बस, खाजगी गाडी यांचा वापर करू शकता.