Pranali Kodre
छत्रपती संभाजी महाराज यांचं राज्य महाराष्ट्रासह गोव्यातील सध्याच्या आठ तालुक्यांमध्येही होतं.
शंभूराजांच्या आज्ञेचा एकमेव दगडी शिलालेख सध्या उपलब्धही असून तो गोव्यातील बाणस्तारी येथील सन १६९९ मधील आहे. हा शिलालेख बाणस्तारीजवळच्या अडकोणमधील शांतादुर्गा मंदिराच्या चौथऱ्यावर होता.
सध्या हा शिलालेख पणजीमधील गोवा राज्य वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे.
शिवकालिन आगभाडे नावाचा कर माफ केल्याच्या आज्ञेचा आहे. हा कर दोन ठिकाणच्या नदीवर येण्या-जाण्याचे पैसे माफ केल्याच्या आज्ञेचा आहे.
हा शिलालेख देवनागरी लिपीतील असून मराठी भाषेत आहे. यात २२ ओळी आहेत आणि दोन्ही बाजूंना व खाली गाईची चित्रे आहेत. त्यात शुभं भवतु असंही कोरलेलं आहे.
या शिलालेखात फोंडा महालातील प्रतिष्ठीत नागरिक तिम नायक आणि त्याच्या मुलाने छत्रपतींचे गोवा राज्य हे हिंदू राज्य झाले आहे, असं म्हटल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हेच या शिलालेखाचे वैशिष्ट्य देखील आहे.
या शिलालेखातून महाराजांचे अधिकारी प्रजेला जाचक वाटणारे कर माफ करत असल्याचे लक्षात येते.
१६६४ पासून छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यातील अनेक तालुके आदिलशहाकडून जिंकले होते. त्यामुळे तिथेही मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा दिसून येतात.